सख्ख्या चुलत्याकडून पुतणीवर बलात्कार; लोणी काळभोर येथील घटनेने खळबळ; आरोपीला बेड्या…


लोणी काळभोर : पित्यासमान असलेल्या सख्ख्या चुलत्याने पुतणीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर परिसरात नातेसंबंधांनाच काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून बलात्काराचा व गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.फिर्यादी या घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आहेत. एके दिवशी त्या कामावरुन नेहमीपेक्षा लवकर घरी पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला दीर मोठ्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहताच फिर्यादींच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत अधिक चौकशी केली असता, तिने चुलता आपणास धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचे व आपण भीतीपोटी हा प्रकार दीर्घकाळ कुणालाही सांगितला नाही असे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या निंदनीय घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!