उरुळीकांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव शंकर पाटील यांची गळफास घेऊन आत्महत्या; इच्छामरणाची परवानगी न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या…


उरुळीकांचन : मानसिक धक्कातून जिवीतपणीच इच्छामरणाची इच्छा व्यक्त करीत उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते शंकर पांडुरंग पाटील (वय ४८ रा. आश्रम रोड ,उरुळीकांचन ) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोशल मिडीयात चिठ्ठी टाकुन आपल्या कोणाला जबाबदार धरु नये असा मजकूर लिहून त्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

राहत्या घरात सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. मानसिक धक्कातून न सावरल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून इच्छामरणाची परवानगी मिळत नसल्याने आपण हा मार्ग निवडल्याचे चिठ्ठी आढळून आली आहे.

शंकर पाटील हे अविवाहित असून ते कस्तुरी प्रतिष्ठानच्या सचिव म्हणून कार्यरत होते. सामुदायिक विवाह सोहळा, आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या अन्नदानासाठी सेवेत ते काम करीत होते. त्यांच्या अशापध्दतीने जीवनसंपविण्याचा निर्णयाने उरुळीकांचन परिसरात शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!