सरकारने घेतला मोठा निर्णय!! LPG गॅस धारकांना सर्वात मोठा झटका, नवा नियम लागू, जाणून घ्या….


नवी दिल्ली : देशभरात जाणवणाऱ्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर ताण आल्याने, गॅसचा साठा वाचवण्यासाठी आणि तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

ज्यानुसार ठरावीक लोकांना गॅस सिलिंडर घेता येणार नाही. या नवीन निर्णयानुसार, आता विशिष्ट ग्राहकांना नवीन सिलिंडर मिळणार नाहीत आणि रिफिलिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.

ज्यांच्या घरात पाइपद्वारे नैसर्गिक गॅसचा पुरवठा होतो, अशा नागरिकांना आता घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाहीये. ‘ज्यांच्याकडे PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी LPG कनेक्शन तात्काळ परत करावे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. तसेच ‘PNG कनेक्शन असलेल्या व्यक्तींना LPG सिलिंडर रिफिल देखील आता मिळणार नाहीये. हा आदेश आजपासून लगेच लागू करण्यात आला आहे.

कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य: ज्या ग्राहकांकडे पीएनजी आणि एलपीजी ही दोन्ही कनेक्शन्स आहेत, त्यांनी त्यांचे एलपीजी कनेक्शन तातडीने गॅस वितरकाकडे जमा करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्याच्याकडे पीएनजीचा पर्याय उपलब्ध आहे, त्यांनी एलपीजीचा वापर थांबवावा, जेणेकरून मर्यादित असलेला सिलिंडरचा साठा केवळ दुर्गम भागातील किंवा पीएनजी नसलेल्या कुटुंबांना मिळू शकेल. एकाच वेळी दोन प्रकारची इंधने वापरणाऱ्या ग्राहकांमुळे गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे गॅसच्या आयातीवर मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे देशांतर्गत वितरण व्यवस्था सुलभ करणे आवश्यक झाले आहे.

…तर होणार कारवाई

सरकारने स्पष्ट केले आहे की, एलपीजी कनेक्शन स्वतःहून परत करण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, जर कोणी एकाच वेळी दोन्ही कनेक्शन्स वापरत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!