नरेंदर भी गायब है, सिलेंडर भी गायब है!! गॅस टंचाईमुळे मोदी सरकार अडचणीत, होतोय टिकांचा भडीमार…


मुंबई : सध्या गॅस टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत असून लोकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहवा लागतंय, हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लगोतय. तर काहींवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे.

या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून अनेक शतकऱ्यांचा माल देशात अडकून सडत चालला आहे, त्यांचं नुकसान होतंय. देशात गोंधळाची परिस्थिती असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईच्या याच मुद्यावरू शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, राजधानी दिल्लीत एका घोषणेने धूम माजवली आहे, ती म्हणजे नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब. त्याचं उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला. माझ्या घरात ही परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये असं राऊत म्हणाले. महानगर गॅसचं येतंय पण आम्हाला एखादं सिलेंडरही लागतंय, सिलेंडरची गरज सर्वांनाच आहे.

मला 60-70 लोकं भेटले, सिलेंडर कुठून मिळवायचा विचारत होते. असेही राऊत यांनी सांगितले आहे. नोदबंदीनंतर आता लोकं सिलेंडरसाठी लाईनीत उभे आहेत. नोटबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या, त्या रांगेत लोकं मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकतं अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय.

हे सरकार जनता विरोधी आहे, याला उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला. आंतराराष्ट्रीय राजकारणात सरकार संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भाजपचा छंद आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!