PM किसान योजनेचा २२ वा हप्ता खात्यात जमा झालाय का? एका मिनिटात तपासा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे.

जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही तर घाबरून जावू नका. काही गोष्टींची पूर्तता न केल्याने हा हप्ता आज तुम्हाला मिळाला नसेल. ईकेवायसीसह एग्रीस्टॅकसारखी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पेलिंगमध्ये चूक झाली असेल तर हा हप्ता थांबवण्यात आला नसेल.
सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हप्ता खात्यात जमा झाला की नाही, हे तपासण्याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. मात्र ही माहिती आता शेतकरी घरबसल्या काही मिनिटांत सहज तपासू शकतात.

या वेळी 22 व्या हप्त्याच्या माध्यमातून सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी देशभरातील जवळपास 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही हे ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर ‘Farmer Corner’ या पर्यायावर क्लिक करून ‘Beneficiary Status’ हा पर्याय निवडावा.
यानंतर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून ‘Get Data’ वर क्लिक केल्यास लगेच पेमेंट स्टेटस दिसून येईल. जर हप्ता जमा झाला नसेल तर घाबरण्याची गरज नाही. अनेकदा ई-केवायसी पूर्ण नसेल, आधार लिंक नसेल किंवा एग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर हप्ता थांबू शकतो.