कुंभमेळा गर्ल मोनालिसाने मुस्लिम बॉयफ्रेंडशी केलं लग्न, घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट…झाली महाराष्ट्राची सून

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा सध्या एक अभिनेत्री आहे. ती कुंभमेळ्यात अगदी साध्या वेशात माळ विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. घारे डोळे आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर ती सगळीकडे खूपच चर्चेत आली होती.

तिचा एक चित्रपटही येणार असून त्याचा ट्रेल फेब्रुवारी 2026 मध्ये रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, आता हीच मोनालिसा आता पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील Arumanoor या मंदिरात जाऊन तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. तिच्या नवऱ्याचे नाव फरमान खान असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोनालिसा आणि फरमान खान हे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमात होते. फरमान खान हा महाराष्ट्राचा आहे. तर मोनालिसा मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील आहे. या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता.

त्यामुळे दोघांनीही कायदेशीर मार्गाने पुढे जात कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. ११ मार्च रोजी केरळमध्ये त्यांनी सर्वप्रथम कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर तिरुवनंतपुरम परिसरातील एका मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. अत्यंत साध्या आणि मर्यादित उपस्थितीत हा विवाह पार पडल्याचे सांगितले जात आहे.
लग्नानंतर मोनालिसाने माध्यमांशी बोलताना आपल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. माझ्या आयुष्याबाबतचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. अनेक अडचणी आणि विरोध असतानाही आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही दोघेही आनंदी आहोत आणि आयुष्य नव्याने सुरू करत आहोत, असे तिने सांगितले.
दरम्यान, या विवाहाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी मोनालिसाच्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी या प्रकरणावर वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले आहेत. प्रेम, कुटुंबीयांचा विरोध आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची धाडस यामुळे मोनालिसा-फरमान यांच्या लग्नाची कथा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.