तरुणाकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने खून, जुन्नरमध्ये भरदिवसा घडली भयंकर घटना…

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहासमोर दिवसाढवळ्या एका तरुणाने धारदार शस्त्राने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

गौरी संजय सावळे (वय.२०) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे वस्तीगृह परिसरात होती. त्याच वेळी महेश मुरलीधर डामसे या तरुणाने अचानक तिच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक वार केल्याची माहिती समोर आली आहे.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला केल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेतील गौरी सावळे हिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दोघेही एकाच गावातील रहिवासी…
प्राथमिक तपासात आरोपी आणि जखमी विद्यार्थिनी हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आरोपी महेश डामसे हा काही दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत असल्याची माहितीही मिळत असून या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.