तुझे ते फोटो व्हायरल करेल….,धमकीला घाबरून त्याचं सगळं ऐकलं, अन् शेवटी पुण्यातील २९ वर्षीय तरुणीसोबत घडलं भयंकर


पुणे : पुण्यात पुन्हा एकदा सायबर चोरट्यांनी डोकं वर काढलं आहे. आता चोरट्यांनी एका २९ वर्षीय तरुणीला तिच्याच खाजगी फोटोंचा वापर करून ‘ब्लॅकमेल’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंढवा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका लोन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. हेच कर्ज फेडण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आले. तरुणीने हे फोन उचलताच त्यांनी कर्जाची रक्कम भरण्यास सांगितलं. तरुणीनं ही रक्कम दिलीही.

मात्र, हे सगळं इथे थांबलं नाही. पुन्हा पुन्हा आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत, या भामट्यांनी तरुणीच्या मोबाईलमधील तिचे खाजगी फोटो ‘मॉर्फ’ (एडिट) करून ते तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.

“पैसे दिले नाहीत, तर तुझे मॉर्फ फोटो व्हायरल करू,” अशी भीती दाखवून या तरुणीकडून वारंवार पैशांची उकळणी करण्यात आली. अखेर बदनामीच्या भीतीने पिचलेल्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!