आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या दर वाढला की घसरला..


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कालपर्यंत ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आज (बुधवार, 11 मार्च) अचानक घसरण पाहायला मिळाली आहे. बाजारात अचानक झालेल्या या बदलामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष सोने-चांदीच्या दरांकडे लागले आहे.

सोने-चांदीचे आजचे लेटेस्ट दर काय आहेत जाणून घेऊया.

गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे आणि जागतिक दबावामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत. आज चांदीच्या किमतीत 1,560 रुपयांची मोठी घट होऊन ती 2.75 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तसेच सोन्याचा दरही 560 रुपयांनी कमी होऊन तो 1.63 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘युद्ध लवकरच संपेल’ असे संकेत दिल्याने बाजारात उत्साह होता. मात्र, आज ‘पेंटॅगॉन’ने स्पष्ट केले की, इराणचा पूर्ण पराभव होईपर्यंत अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरूच राहतील.

तसेच, ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ जाणाऱ्या तेल टँकरना अमेरिका कोणतीही सुरक्षा देत नसल्याचे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसने दिले. या उलटसुलट विधानांमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा थेट फटका सोन्या-चांदीच्या दरांना बसला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंमध्ये घसरण दिसली. जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा दर सुमारे 5224 डॉलर प्रति औंस इतका राहिला, तर स्पॉट चांदीचा दर सुमारे 89 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. पश्चिम आशियातील संघर्ष आणि तेल बाजारातील अस्थिरता याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या निर्णयांवर होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!