अजितदादांना महेशदादांचा धक्का! हवेली बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे झाले पानिपत


पुणे :  हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निर्णायक मदत राष्ट्रवादी च्या बंडखोरांना निर्णायक ठरली आहे. महेश लांडगे यांनी त्यांच्या मतदारसंघातील १२७ सोसायटी मतदानापैकी ११३ मते राष्ट्रवादी बंडखोरांच्या पॅनेलला देऊन पॅनेलला लीड देऊन विजयी केले आहे.

आ. महेश लांडगे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते विकास दांगट यांचे मेव्हणे तर रोहिदास उंद्रे यांचे ते दाजी आहेत. त्यामुळे पाहुणे मंडळींनी या बंडखोर नेत्यांच्या पॅनेलला मदत केल्याचे पुढे आले आहे.

यामुळे हवेली तालुक्यात  पुन्हा एकदा अजित पवार यांना शह देण्यात भाजप यशस्वी झाली आहे. हवेलीचा उपबाजार पिंपरी-चिंचवडमधील मोशीत आहे. मोशी हे भोसरी मतदारसंघात मोडते.तर,भोसरीचे आमदार पैलवान लांडगे आहेत.ज्या मुख्य बंडखोरामुळे हवेलीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले.

हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत पूर्व हवेलीची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांनी आ.लांडगेंवर सोपवली होती.सोसायटीच्या १६२६ मतदारांपैकी ६२६ मतदार हे पूर्व हवेलीतील आहेत.

राष्ट्रवादीच्या बंडखोरांसह हवेलीत भाजपचे पॅनेल बनविण्यात आ. लांडगेंचा सहभाग होता. यामुळे राष्ट्रवादीचे याठिकाणी पानिपत झाले. 

अजित पवार यांच्या वक्तयाने चर्चेला सुरुवात …     

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काल पुण्यात बाजार समिती निवडणूकीच्या निकालावरून भाष्य केल्याने चर्चेला सुरुवात  झाली आहे. अजित पवार यांनी निकालावरुन भाजपचा फारसा काही संबंध या निवडणुकीत नसल्याचे सांगून हे राष्ट्रवादी चेच पदाधिकारी असल्याचे बोलले आहे. राष्ट्रवादीने नुकतेच निलंबीत केलेले विकास दांगट हे आपल्या भेटीला येत असल्याचे सांगून  संचालक मंडळात नव्याने निवडणूक आलेले गणेश घुले,अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे हे आपल्याच विचारांचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विकास दांगट यांच्या बद्दल भूमिकेवर अजित पवार मौन बाळगल्याने राष्ट्रवादी ने पुन्हा सोईची भूभिका घेतली का म्हणून चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!