पैसे काढण्यासाठी ATM ची गरज नाही, कार्डशिवाय पैसे काढता येणार? जाणून घ्या ‘ही’ पद्धत…

पुणे : तुम्हाला पैसे काढण्यासाठी ATM ची गरज नाही. हो. आजच्या डिजिटल युगात बँकिंग वेगाने बदलत आहे. आता ATM कार्ड नसतानाही ATM मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. होय. हे आपल्या फोनवरून ऑनलाइन पेमेंट करण्याइतके सोपे आहे.

जर तुमच्या फोनमध्ये UPI अॅप असेल तर तुम्ही फक्त QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकता. अनेक बँका आता त्यांच्या ATM मध्ये UPI कॅश विड्रॉवल किंवा QR कोड स्कॅनचा पर्याय देतात. यामुळे केवळ पैसे काढणे सोपे होत नाही, तर कार्ड क्लोनिंग आणि स्किमिंग सारख्या सायबर फसवणूकीपासून देखील संरक्षण होते. चला जाणून घेऊया पद्धत.
सर्वप्रथम ‘UPI Cash Withdrawal’ किंवा ‘ICCW’ सुविधा असलेले एटीएम शोधा. एटीएम मशीनच्या स्क्रीनवर ‘UPI Cash’ किंवा ‘Cardless Cash’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाइप करा.

रक्कम टाकल्यानंतर स्क्रीनवर एक QR कोड दिसेल. आता मोबाईलमध्ये असलेले यूपीआय ॲप उघडा. उदाहरणार्थ BHIM, Google Pay, PhonePe किंवा Paytm यापैकी कोणतेही ॲप वापरता येते. त्या ॲपमधून QR कोड स्कॅन करा.
तसेच यानंतर ॲपमध्ये तुमचे बँक खाते निवडा आणि 4 किंवा 6 अंकी UPI PIN टाका. व्यवहार यशस्वी झाल्यानंतर काही क्षणांत एटीएम मशीनमधून तुमची रोख रक्कम बाहेर येईल.
या पद्धतीमुळे एटीएम कार्ड सोबत ठेवण्याची गरज राहत नाही. कार्ड चोरीला जाणे, हरवणे किंवा कार्ड क्लोनिंगसारखे धोके टाळता येतात. तसेच यूपीआय ॲप्सच्या सुरक्षिततेमुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतो. भारतात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे ही सुविधा ग्राहकांसाठी मोठी सोय ठरत आहे.
तसेच यूपीआयद्वारे कार्डलेस कॅश विथड्रॉल करताना एका व्यवहारात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढता येतात. मात्र ही मर्यादा तुमच्या बँकेच्या दैनिक यूपीआय लिमिटनुसार बदलू शकते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.