रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, भर मैदानातच….व्हिडीओ व्हायरल


मुंबई : भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारसताने न्यूझीलंडवर मात करून जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सध्या तुम्ही सोशल मीडियावर गेले तर सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीचीच वाहवा होताना दिसत आहे.

भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानावर काय काय घडलं? हे सांगणारे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर जगभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. परंतु सध्या मात्र भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवून जेतेपद पटकावल्यानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असतानाच, रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्यात भांडण झाले की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दोघांचे हावभाव पहाता दोघांमध्ये काही तरी हमरी तुमरी झाल्याचं जाणवत आहे. त्यांच्या हावभावांमुळे दोघांमध्ये वाद झाला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही सोशल मीडिया यूजर्सनी तर या व्हिडिओच्या आधारे दोघांमध्ये भांडण झाल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही वेळाचाच आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि रितिका मैदानाच्या बॉन्ड्री लाईनवर उभे आहे. तिथे ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये रोहितच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असून तो रितिकाच्या बोलण्यावर असहमती दर्शवताना जाणवतोय. रितिकादेखील काहीशा रागात बोलताना दिसत आहे.

या दोघांमधील हा संवाद पाहून त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा, असा तर्क लावला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कमेंट ही आल्या आहेत.

दरम्यान, या व्हिडिओमागील नेमकं कारण काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा केवळ साधा संवाद होता की काही वेगळं, याबाबत स्पष्टता नाही. मात्र फायनलच्या आधीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!