युद्धाचा भडका पेटणार! इराणच्या पुढच्या उत्तराधिकारीला मारण्याची इस्रायलची प्रतिज्ञा,तणाव वाढणार…


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण -इस्राईलच्या युद्धाला आठ दिवस होऊन गेले तरी युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही.आतापर्यंत हजारो लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. या युद्धाचा भडका उडाला असतानाच आता इस्रायलने एक मोठी प्रतिज्ञा बोलून दाखवली आहे. त्यामुळे इराणचं टेन्शन आणखीन वाढणार आहे.

इराण इस्त्राईलच्या युद्धाच्या पहिल्याचं दिवशी सुप्रीम लीडर अयातोल्लाह अली खामेनीला संपवलं. आता त्यांच्यानंतर पुढचा उत्तराधिकारी कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. अयातोल्लाह अली खामेनी यांच्या नंतर त्यांचा जो कोणी उत्तराधिकारी बनणार त्याला आणि त्याची निवड करणाऱ्या लोकांना संपवणार अशी प्रतिज्ञाच इस्रायलने केली आहे. त्यामुळे युद्ध आणखीनच भडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले सुरु आहेत. दुसरीकडे इराणकडून इस्रायल आणि आखाती देशांवर हल्ले होत आहेत. हे युद्धात इतक्यात तरी संपणार नाही असे यावरून स्पष्ट होत आहे.

अमेरिका- इस्त्राईल आणि इराण यांच्या युद्धाचा भडका उडला असताना इराण जो पर्यंत सत्ता बदल होत नाही, त्यांच्या मनासारखा नवीन शासक तिथे येणार नाही, तो पर्यंत हे युद्ध थांबणार नाही, हे अमेरिका आणि इस्रायल दोघांनी स्पष्ट केलय. त्यामुळे इतक्यात तरी या युद्धाचा शेवट नाही. उलट दिवसेंदिवस हे युद्ध अजून भीषण होत जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!