पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण,लवकरच वाहतुकीसाठी खुला…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा उड्डाणपूल महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या पुलामुळे बाणेर,पाषाण आणि विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

दुमजली उड्डाणपूल हा अतिशय खास असून वरच्या स्तरावर मेट्रोमार्गिका आणि खालच्या स्तरावर वाहन धावणार आहेत. या संयोजनामुळे चौकातील सिग्नल वरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतुकीचा वेग वाढेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे. या पुलामुळे विद्यापीठ रस्ता,पाषाण आणि बाणेर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. लवकरच हा पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. हा डबल डेकर फ्लावर शहराच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे भविष्यात पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासोबत प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!