लाखो रेशन कार्डधारकांना दणका! सरकारच्या नव्या कडक निकषामुळे लाभ बंद होणार,काय आहेत नियम?


पुणे : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात येणार आहेत.या रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केलीआहे.ज्यात उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन, आयकर आणि ई-केवायसी यांसारख्या कडक निकषांमुळे अपात्र कुटुंबांचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते. याचा रेशन कार्डधारकांना मोठा दणका बसणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून वन नेशन वन रेशनकार्ड या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. यासाठी 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमांत मोठे बदल करण्यात येणार आहेत. या नवीन बदलांमुळे देशातील लाखो अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कायमची वगळली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डसाठी नवीन आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी उत्पन्नाची आणि मालमत्तेची मर्यादा निश्चित केली आहे. जर यातील कोणताही एक निकष तुमच्या रेशन कार्ड लागू झाल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागांसाठी उत्पन्नाची मर्यादा तीन लाख निश्चित करण्यात आली आहे तर ग्रामीण भागासाठी दोन लाखाची मर्यादा आहे.यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही. ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे. 100 चौरस मीटर पेक्षा जास्त प्लॉट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात. घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

तसेच ज्या लाभार्थ्यांच्या घरात एसी किंवा जनरेटर सारख्या सुखसोयी आहेत, त्यांनाही या यादीतून बाहेर काढले जाणार आहे.
त्यासोबतच ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. यासाठी केवळ नियमच बदलले नाहीत, तर प्रशासकीय प्रक्रियाही कडक करण्यात आली आहे. सर्व रेशन कार्डधारकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!