हवेलीत अजित पवार यांचा शिक्का खोटा ; बंडखोरांकडून राष्ट्रवादी चा सोसायटी गटात सुपडा साफ…!

उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली बाजार समितीच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा 13 विरुद्ध 2 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आहे.

आशिया खंडात श्रींमत बाजार समिती असणाऱ्या हवेली बाजार समितीची १९ वर्षानंतर होत असलेल्या निवडणूकीत काय होणार म्हणून जिल्ह्याचे लक्ष या बाजार समितीवर लागले होते. राष्ट्रवादीच्याच या बाजार समितीवर कामकाज पाहिलेल्या पूर्वीच्या संचालक मंडळातील संचालकांनी वेगळी वाट धरल्याने सत्तेच्या सारीपाटासाठी राष्ट्रवादी ला बंडखोरांचे आव्हान स्विकारुन स्वतंत्र पॅनेलची उभारणी करावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने निष्ठेच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे निवडणूक लढवली होती.
अजित पवार हे बंडखोर पदाधिकाऱ्यांना धडा शिकवणार म्हणून राष्ट्रवादी ने निवडणूकीची पूर्ण तयारी केली होती. परंतु निकालानंतर सर्व शक्यता व भाकिते बंडखोरांनी खोटी ठरवली असून ‘यहा के हम सिकंदर ‘ म्हणून सेवा संस्था गटात ११ विरुद्ध ० असा धुव्वा उडविला आहे. तर ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ जागांपैकी २ जागांवर विजय मिळविला आहे.

बाजार समितीच्या व्यापारी -आडते व हमाल या उर्वरीत ३ जागांसाठी स्वतंत्र शारदा गजानन पॅनेलचे अनिरुद्ध भोसले व गणेश घुले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर हमाल जागेवर संतोष नांगरे हे विजयी झाले आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे–
सोसायटी मतदार संघातील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे विजयी उमेदवार- रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड व लक्ष्मण साधू केसकर
महिला विजयी उमेदवार- मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे
ग्रामपंचायत गट- सुदर्शन जयप्रकाश चौधरी, रवींद्र नारायणराव कंद.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढील प्रमाने- रामकृष्ण हेमचंद्र सातव, आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत गट)
व्यापारी मतदार संघ- गणेश सोपान घुले व अनिरुध्द अरुण घुले.
हमाल-मापाडी मतदार संघ- संतोष नांगरे