मुलीचा ऑनलाईन छळ !मग बापाने विद्यापीठात येऊन मुलाला लोळेपर्यंत चोपले ; लोणीकाळभोरच्या एमआयटी विद्यापीठातील प्रकार ….


लोणी काळभोर : येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आवारात गेल्या १५ दिवसांपासून मुलीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठात शिकत होता.गेल्या १५ दिवसांपासून पीडित तरुणीला ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. आज तो विद्यार्थी पुन्हा लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आवारात आला असता, तिच्या वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावले, ज्याचे रूपांतर वादात झाले.

धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकाराबाबत पीडित कुटुंबाने आधीच विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. “विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन कोणत्या घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी कॅम्पसमध्ये येऊन मुलींची छेड काढतोच कसा? असा सवाल उपस्थित झाला आहे.

याप्रकरणी सदर मुलीच्या वडिलांकडून एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्या तरुणाच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!