मुंबई- छत्रपती संभाजीनगर विमान सेवेबाबत महत्वाची अपडेट, वेळापत्रक अन् लोकेशन बदललं, आता कुठून झेपावणार?, जाणून घ्या…


मुंबई : मुंबई–संभाजीनगर-मुंबई मार्गावरील विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल होणार असून इंडिगोची सायंकाळची फ्लाइट येत्या 29 मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहे.

ऑनलाईन आरक्षण प्रणालीतही त्यानुसार बदल करण्यात आला आहे. या बदलासोबत मुंबईच्या उड्डाण वेळापत्रकातही काही प्रमाणात फेरफार होणार असल्याचे माहिती आहे. ‎सध्या इंडिगो या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा विमानसेवा देते.

दोन्ही फ्लाइट्स सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालवल्या जात आहेत. मात्र उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर सायंकाळची फ्लाइट नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतून नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या प्रवाशांना मोठा वेळ द्यावा लागतो आणि प्रवास तुलनेने किचकट ठरतो. आवश्यक रस्ते, उड्डाणपूल तसेच महानगर रेल्वेची कामे पूर्ण होईपर्यंत सायंकाळची सेवा तेथे हलविणे म्हणजे नियमित प्रवाशांवर अतिरिक्त ताण टाकण्यासारखे आहे.

त्यामुळे ‎या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे. ‎या मार्गावरील विमानसेवा अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी सोयीची ठरली असून व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात या सेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांचा विचार करून इंडिगोने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!