युद्धाचा परिणाम! १६७ किमीचा रस्ता बंद, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार भयंकर वाढ, जाणून घ्या…

नवी दिल्ली : इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्ध संघर्ष पेटला आहे. अजून काही महिने हे युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. या युद्धाचा जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातंर्गत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे होर्मुझची सामुद्रधुनी. १६७ किलोमीटरचा हा सागरी मार्ग व्यापाराच्या दृष्टीनं खूप जास्त महत्त्वाचा आहे. भारतात येणारं क्रूड ऑईल हे याच मार्गाने येतं. भारत या मार्गाचा जवळपास ८० टक्क्यांहून अधिक वापर करत. हा मार्गच युद्धामुळे बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे जगाचं आणि भारताचं टेन्शन वाढलं आहे. जगाची ५०% ऊर्जेची गरज याच मार्गावरून पूर्ण होते. आता इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने भारतात चिंतेचे वातावरण आहे.

ओमान आणि इराणच्या दरम्यान असलेला हा अरुंद समुद्रमार्ग जगातील सर्वात महत्त्वाचा ‘ऑईल हायवे’ मानला जातो. जगातील एकूण तेल वापराचा पाचवा हिस्सा याच १६७ किमीच्या मार्गावरून जहाजांद्वारे प्रवास करतो. इराणने इशारा दिला आहे की, या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला ‘आग’ लावली जाईल. जर हा मार्ग बंद झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलरवरून थेट २०० डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतासाठी ही बातमी धोक्याची घंटा आहे. याचे कारण खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते..
पेट्रोल-डिझेलचे दर – कच्च्या तेलाचे भाव वाढले की भारतात इंधनाचे दर गगनाला भिडतील. यामुळे मालवाहतूक महाग होईल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच महाग होईल.
LPG गॅसचा धोका- सर्वात जास्त धोका तुमच्या घरातील गॅस सिलेंडरला आहे. भारत आपल्या वापराच्या एकूण गॅसपैकी दोन-तृतीयांश गॅस आयात करतो. त्यातील ८५ ते ९० टक्के गॅस हा खाडी देशांतून (Hormuz मार्गे) येतो. जर हा पुरवठा थांबला, तर गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी काही दिवसांचा बॅकअप आहे. साधारणपणे १७ ते १८ दिवस पुरेल इतका कच्चा तेलाचा साठा भारताकडे आहे. २० ते २१ दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. जर पुरवठा पूर्णपणे बंद झाला, तर सध्याचा साठा जेमतेम दोन आठवडे पुरू शकतो इतकाच LPG चा साठा भारताकडे मर्यादीत उपलब्ध आहे.