दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात शेती सिंचनाच्या पाणी वाटपाच्या अन्यायाचा पहिला अध्याय सुरू! खडकवासला उजव्या मुठा कालव्यातून हवेली व दौंड तालुक्यातून बंदोबस्तातून पाणी इंदापूरकडे रवाना…


जयदीप जाधव

उरुळीकांचन : पानशेत , वरसगाव , टेमघर व खडकवासला या धरण प्रकल्पासाठी बाधित पुर्नवसितांना आपल्या जमीन देऊन शेतीसिंचनासाठी हक्काच्या आरक्षित असलेल्या पाण्यालास्वतः च्या डोळ्यांसमोर मुकावे लागत असल्याची आवस्था खडकवासला जलसंपदा विभागाच्या तुघलकी निर्णयाने झाल्याची परिस्थिती हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना गेली दहा दिवस भोगण्याची वेळ आली आहे.

खडकवासला प्रकल्पात एकून क्षमतेच्या साठ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना या विभागाने प्रकल्पातून मुठा उजव्या कालव्यात सोडलेले आवर्तन पाणी चोरीच्या नाव वापरुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंदोबस्त सोडल्याने हवेली व दौंड तालुक्यातील कालव्याशेजारील नागरीकांचा संताप उडाला असून दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात झालेल्या या
निर्णयाने शेतकऱ्यांत प्रचंड संताप उडाला आहे.

खडकवासला जलसंपदा विभागाने हवेली, दौंड व इंदापूरसाठी प्रकल्पातून १७ फेब्रुवारी पासून सोडलेले उन्हाळी आवर्तन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हवेली व दौंड तालुक्यात गेली दहा दिवस बंदोबस्तात कालव्यातून पुढे सरकत आहे. या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महावितरणच्या मुळशी व बारामती उपविभागीय महावितरण कार्यालयांना आदेश काढून या कालव्याभोवती वीजपुरवठा खंडीत करुन तसेच रात्री पुरवठा बंद ठेवण्याचा आदेशाने शेतकऱ्यांत संताप उडाला आहे.

या आवर्तनात गेली दहा दिवस हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यास मनाई घातली असून विभाग हा पाणी उचलण्याऱ्या शेतकऱ्यांना चोर हिणवून पाईप लाईन मोडतोड करुन कालव्यातून पाणी उचण्यास प्रतिबंध घातला असल्याने या प्रकाराने शेतकऱ्यांत संताप उडाला आहे.

हवेली तालुक्यातील सद्यास्थितीत कालव्याभोवती गावांत सक्तीच्या आदेशाने वीजपुरवठा रोहित्रे बंद करुन खंडीत करण्यात येत असून शेतकऱ्यांना या कारणाम्याने होळीच्या आधी तोडाने बोंब मारण्याची परिस्थिती उद्भवली आहे. तालुक्यातील मुळा मुठा कालवा व जुना बेबी कालव्यावर मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र उभे आहे. कालव्यातून पुरवठा योजनाद्वारे हे ऊस क्षेत्र उभे आहे. मात्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू झाल्याने तसेच सिंचनाची कमतरता जाणवू लागल्याने पुर्नवसितांना हक्काच्या जमीनी देऊन या तालुक्यावर तुघलकी न्यायाने शेतकऱ्यांवर पाण्याची कुऱ्हाड कोसळली आहे.

सद्यस्थिती खडकवासला कालव्यात १७.११ पाणीसाठा शिल्लक असताना सिंचनासाठी बंदोबस्तात पाणी पुढे नेण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न कशासाठी हा प्रश्न हवेली व दौंड तालुक्यातील जनतेला पडला आहे.प्रकल्पात पुणे शहर व शेतीला पुरवठा होईल इतक्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असताना हे हवेली व दौंडच्या तोंडाची पाने पुसून पाणी पुढे नेण्याचा प्रयत्न कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. हवेलीत यापूर्वी जुना बेबी कालवा हा अस्तरीकरण पूर्ण झाला आहे.

तशीच आवस्था नवीन मुठ्या कालव्याची असून अस्तरीकरणाने हक्काचे विहीर व बोअर वेल यांचे पाणी स्त्रोत घटल्याने अशातच पाण्याची ओरड तीव्र आहे. त्यातच उन्हाळी आवर्तन जलसंपदा विभागाने बंदोबस्तात पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने हवेली व दौंड तालुक्यात कालवा काठावरील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्यानंतर निर्णय कोणाचा?

दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे. प्रशासनाच्या कामाचा अनुभव असलेल्या सुनेत्रा पवार यांना यापुढे कालवा सल्लागार समितीत प्रकल्पाच्या पाणी वाटपाचा निर्णय घ्यायचा आहे. मात्र त्यांनी अधिकृतपणे बैठक घेण्यापूर्वी हवेली व दौंड तालुक्यातील उन्हाळी आवर्तन विशेष काळजी घेऊन बंदोबस्तात पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने जलसंपदा विभाग कोणाच्या नियंत्रणात निर्णय घेतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!