PM किसानच्या 22 व्या हफ्त्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार? नवीन अपडेट आली समोर


मुंबई : पीएम किसानच्या 22 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.फेब्रुवारी महिना संपत आला तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोठा आर्थिक आधार ठरत आहे. आतापर्यंत या योजनेचे 21 वे हप्ते यशस्वीपणे वितरित झाले असून 22 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांच लक्ष लागले आहे. या हप्त्याचे पैसे आले नसल्यामुळे
शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, हा हप्ता होळीपूर्वी मिळणार की सणानंतर, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारीत येणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही अधिसूचना किंवा कार्यक्रम जाहीर न झाल्याने आता मार्चमध्येच हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पी एम किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई -केवायसी, बँक खात्याचे आधार लिंकिंग, लँड शेडिंग ही तीन कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळणार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!