मुंबईत बांधकाम साईडवर भंयकर दुर्घटना! 8 व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा जागीच मृत्यू..


मुंबई : मुंबईतील चेंबूरमधील एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना आठव्या मजल्यावरून सहा कामगार खाली पडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सुभाष नगरमधील एका नव्या इमारतीचे बांधकाम करत असताना अचानक तांत्रिक बिघाड किंवा तोल गेल्याने 6 कामगार थेट खाली कोसळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे इमारतीचे बांधकाम करत या कामगारांनी कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट किंवा सुरक्षिततेची साधने वापरली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या अपघातातील,जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बांधकाम करताना सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रप्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!