शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, सुनेत्रा पवार, अजितदादांसह ७० जणांना क्लीन चिट…

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कथित घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शिखर बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता

याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण अहवालविशेष न्यायालयाने स्वीकारला. या अहवालात सर्व राजकीय नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली. याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट समोर आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना क्लीन चीन देण्यात आली आहे
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळाप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितल होतं.

पण, अजित पवार उपमुख्यमंत्री बनून शिंदे-फडणवीस महायुती सरकारसोबत येताच पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी कोर्टात नव्याने अर्ज दाखल केला. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील विरोध याचिका रद्द करण्याकरता मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे नव्यानं अर्ज केला होता.
आता, विशेष न्यायालयाने शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने सुनेत्रा पवारांशी निगडित कंपनीसह दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्वरित ७० जणांना क्लीनचीट मिळाली आहे. या क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारेंसह इतरांनी दाखल केलेल्या निषेध याचिकाही (प्रोटेस्ट पीटिशन) विशेष न्यायालयाने फेटाळल्या आहेत.