तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही, खूप वेदनादायी…! अजितदादांच्या आठवणीत रोहित पवारांची भावनिक पोस्ट…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांसह अख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे अतिशय भावुक झाले असून त्यांनी आज सोशल मीडियावर अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे कि, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..खूप वेदनादायी..! असं म्हणत त्यांनी ती पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला.या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यानंतर आता आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील दादा सोबतच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!