मुंबईत JBCN इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बस्फोटाची धमकी ; पालकांमध्ये भीतीचे वातावरण..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक शाळांना बॉम्बस्फोटाची ईमेलद्वारे धमकी मिळाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.अशातच आता मुंबईतील दहिसर येथील JBNC इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बस्फोटाची ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,JBNC International School ला बॉम्बस्फोटाची धमकी आल्यानंतर शाळा व प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तात्काळ सुट्टी जाहीर केले आहे.पालकांना मुलांना सुरक्षितरित्या घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही व्यापक कट आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

दरम्यान शाळेच्या इमारतीसह आसपासच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली असून नागरिक आणि पालकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. शहरातील शाळांभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!