दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकराचा पैशांचा तगादा…; मजुरी करणाऱ्या तरुणाची मन हेलावणारी सुसाईड नोट…


जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात हात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,योगेश सुनील चौधरी (वय-२६) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या या योगेशने सावकाराकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. या रकमेच्या बदल्यात सावकाराने आतापर्यंत योगेशकडून दोन लाख रुपये व्याजापोटी वसूल केले होते. तरीही सावकाराची पैशाची भूक शमली नव्हती. तो वारंवार योगेशकडे अधिक पैशांचा तगादा लावत होता. या त्रासाला कंटाळून योगेशने घरी गळफास घेऊन त्याच आयुष्य संपवलं.

योगेशने मृत्यूपूर्वी सुसाइड नोटमध्ये असे नमूद केले आहे कि, सावकार पिंटू यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.
त्याने केवळ पैशांचा तगादाच नव्हे, मारहाण देखील केली होती आणि त्याच्या वृद्ध आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.

या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे योगेशने चिठ्ठीत नमूद केले आहे. “पिंटूला कडक शिक्षा व्हावी,” असेही चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!