संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग राहणार बंद? पर्यायी व्यवस्था काय?


पुणे: संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने भाविक देहूत दाखल होत असतात. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. यंदा 5 मार्चला बीज उत्सव होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून 4 ते 6 मार्च दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्याच्या उत्सव काळात देहूकडे जाणाऱ्या काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. देहूगाव कमान (जुना मुंबई–पुणे महामार्ग) ते देहू मार्ग, महिंद्रा सर्कल ते फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे चौक आणि आयटी पार्क चौक हा रस्ता बंद राहील. तसेच तळेगाव–चाकण रोडवरील देहू फाटा ते देहूगाव मार्गही वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. भक्ती-शक्ती चौक, मोईफाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक तसेच कुदळवाडी सर्कल या मार्गांवरून वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान आयटी पार्क व कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणीनगर चौक (निगडी) ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्ग या मार्गांवरही निर्बंध असतील. 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक आणि काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान व परंडवाल चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक ते झेंडे मळा जकात नाका) हा वन-वे करण्यात आला असून झेंडेमळ्याकडून कंद पाटील चौकाकडे प्रवेशबंदी लागू असणार आहे.

भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आळंदी–तळवडे मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी माउली वजनकाटा तसेच काळोखे पाटील चौक आणि लगतच्या गायरान परिसरात पार्किंगची व्यवस्था असणार आहे.संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत कडक निर्बंध असणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!