अजित पवार विमान अपघाताबद्दल सर्वांना ज्या गोष्टी प्रतिक्षा होती तो अहवाल आजच, नेमकं घडतंय काय?


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसला नाही.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार शपथ घेणार यावर बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही किंवा त्यांच्यासोबत माझी चर्चाही झाली नाही.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी ते आग्रही आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत.

यामध्येच आता अत्यंत मोठी अपडेट आलीये. अजित पवार अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार अपघातप्रकरणी प्राथमिक अहवाल सायंकाळी 7 पर्यंत येणे अपेक्षित आहे.

Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून Directorate General of Civil Aviation (DGCA) कडे अहवाल सुपूर्द होणार. दोन दिवसांपूर्वी VSR कंपनीच्या विमानांवर प्रश्न; पाच विमानांना तात्पुरती बंदी घालण्यात आली.

अपघाताच्या कारणांवरून मोठा खुलासा शक्य असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष या अहवालाकडे आहे. या प्राथमिक अहवालातून नक्की काय खुलासा होते याकडे राज्याच्या नव्हे तर देशाच्या नजरा आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!