बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, बसचालकावर गुन्हा..

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमध्ये वारंवार महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच आता शाळेच्या स्कूलबस मध्ये एका अल्पवयीलीन विद्यार्थिनीवर चालकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतनीस नव्हती. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर मधील एका नामांकित,खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. संबंधित विद्यार्थिनीवर बसचालकाने शाळेतून घरी सोडताना बस मध्येच तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पिडीत विद्यार्थिनींन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तात्काळ बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान वारंवार शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना घडुनही शहरातील शाळा, शिक्षण विभाग प्रशासन आणि आरटीओ याबाबत गंभीर नसल्याने या घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
