केडीएमसीत फाईल चोरीची खळबळ ;‘मरीयम टॉवर’ इमारतीचा महत्त्वाचा दस्त गायब, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?


मुंबई : गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभिलेखा विभागात फाइल्स गहाळ होण्याच्या घटना सलग सुरूच आहेत. अशातच आता विभागातून ‘मरीयम टॉवर’ इमारतीची महत्त्वाची फाईल गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

केडीएमसी अभिलेखा विभागातून ‘मरीयम टॉवर’ इमारतीची फाईल गायब होण्याचे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून या इमारतीच्या बांधकामाबाबत बेकायदेशीर कामाचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान याआधी देखील यूसूफ हाईटस या बेकायदा इमारतीची फाईल गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिलेखा विभागातून मरियम टॉवर इमारतीची फाईल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.ही फाईल नेमकी कधी आणि कशी गायब झाली, यामागे निष्काळजीपणा की हेतुपुरस्सर कृत्य आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

महापालिकेच्या विभागातून बेकायदा बांधकामांशी संबंधित कागदपत्रेच वारंवार गायब होत असल्याने या प्रकारामागे मोठे रॅकेट तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!