‘मला आईकडे जायचंय…भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधारगृहात राहिल्यानंतर पलटी, कोर्टात काय झालं?


पुणे : गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेल्या भिगवण अपहरण प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीला सुधारगृहात ठेवण्यात आल्यानंतर तिने जबाबात पलटी दिली आहे. आज बारामती कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी त्या तरुणीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.तिने दिलेल्या या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

काय आहे प्रकरण?

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोन सख्ख्या भावानीं तरुणीला उचलून नेण्याची घटना मंगळवारी( 17 फेब्रुवारी) घडली होती. त्यानंतर तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके स्थापन केली होती.मात्र त्यानंतर या प्रकरणात मुलीचा एक व्हिडीओ समोर आला त्यात तिने दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.

या सर्व प्रकारानंतर मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला सुधारगृहात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज बारामती कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर मुलीने जबाब पलटी मारली आहे. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन काय वेगळं वळण लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याआधी पीडीतेच्या आईने माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या… मला माझं लेकरू द्या! अशी मागणी केली होती. नाहीतर आम्ही आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला होता. सुधार गृहात पाच दिवस ठेवल्यानंतर आता पिडीत तरुणीने आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!