काय भिकारXX…. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन(ता. 23) कालपासून सुरू झाल आहे.विधानसभेत शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा करत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मात्र बोलताना त्यांची जीभ घसरली.तसेच राज्यपालांचे भाषण आणि सरकारच्या निष्क्रियतेवर त्यांनी संताप देखील व्यक्त केला.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमध्ये आली आहे.
आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत या गंभीर मुद्द्यावर सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. काय भीकारचोटपणा सुरू केला आहे. एकीकडे लोक आत्महत्या करतात तर दुसरीकडे 5 ट्रिलियन संदर्भात बोललं जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान 2009 ते 2025 या कालावधीत एकूण 2783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन विभागात आत्महत्येची तब्बल 1987 प्रकरणे समोर आली आहेत.

तसेच वारंवार 14 जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात 21 हजार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील फक्त 10 हजार शेतकऱ्यांना शासनाने मदत केली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.