अर्थसंकल्पात प्रशासनाचा मोठा निर्णय! मुंबई महापालिकेच्या 36 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार,कारणही आलं समोर…

मुंबई: नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकाच्या निवडणुकीत भाजपने तब्बल चार दशकानंतर महापालिकेवर सत्ता मिळवली. आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जात असताना याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आता मुंबई महापालिकेच्या 36 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकास कामांसाठी या ठेवी मोडणार असल्याचे सांगण्यात आल आहे.

मुंबई महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे.
दरम्यान आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. आता या पालिकेच्या ठेवी मोडणार असल्याचा स्पष्ट समोर आल आहे.मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 80952.56 कोटी इतका असणार आहे. 2025-26 च्या तुलनेत यंदा 8.77% नं वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.

मुंबई महापालिकेच्या मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य खात्यासाठी 7456 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेस्ट साठी एक हजार कोटींची तरतूद तर फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच वर्सोवा दहिसर कोस्टल रोड साठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर पासून करमणूक कर लागू होणार आहे. मनपा रुग्णालयासाठी एक हजार 62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात पदभूत आणि गच्चीवरील जाहिरातीनाही मनाई करण्यात आली आहे. असे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहेत.