ब्रेकिंग! भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा; कुणाकुणाला संधी? कोणाला डच्चू?

मुंबई:राज्यातील महानगरपालिका,पंचायत समिती आणि तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता संघटनेत मोठे बदल केले आहे.आगामी राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आपल्या नव्या शिलेदारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली.

भाजपकडून मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची निवड पक्षाची बाजू ठामपणे मांडण्यासाठी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदावर सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर, प्रिया शिंदे,चैतन्य बापू देशमुख,गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे,केशव उपाध्ये, रामदास तडस, संजय भेंडे, संजय कौडगे,भारती पवार, अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच भाजपकडून या नव्या रचनेत चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चा, कृष्णराज महाडिक यांच्याकडे युवा मोर्चा, तर योगेश टिळेकर यांच्याकडे ओबीसी मोर्चाची धुरा सोपवण्यात आली आहे.

भाजपकडून चिटणीसपदी मंगेश चव्हाण, परिणय फुके, प्रशांत ठाकूर, वर्षा ढहाळे, संतोष जनाटे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू,राम सातपुते,प्रवीण घुगे,रेखा कुलकर्णी, भैरवी वाघ यांचा समावेश आहे.
तर सरचिटणीस पदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर या अनुभवी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच पक्षाचे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मिहिर कोटेचा यांची कोषाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.
दरम्यान या घोषणेमुळे गेल्या काही काळापासून प्रतीक्षेत असलेल्या राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ही निवड केवळ पदांची विभागणी नसून, अनुभवाचा वारसा आणि नव्या दमाच्या नेतृत्वाचा एक सुवर्णमध्य असल्याचे दिसून येत आहे.