लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा ; फेब्रुवारी संपत आला तरी 1500 रुपये…

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.जानेवारीचा हप्ता पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पुढच्या 8 दिवसात फेब्रुवारी महिनादेखील संपेल तरी अजूनही जानेवारीचाच हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी अजून कोणताही निधी जमा झालेला नाही. वेगवेगळ्या विभागाकडून हा निधी जमा केला जातो. यानंतर या निधीतून योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे दिले जातात. दरम्यान, अजूनही हा निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळेच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता फेब्रुवारी संपत आला तरी लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी आता आणखीन वाट पहावी लागणार आहे.
जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे, अशी देखील माहिती समोर आली होती. याबाबत निर्णय जारी करण्यात आला आहे, यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

दरम्यान, आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु हे पैसे कधी जमा होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.