संतोष देशमुख हत्या प्रकरण ; फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी आला…’, धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या,प्रकरणात आज बीडच्या सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी धक्कादायक दावा केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सीआयडीला माहिती देण्यात आली असून सुरक्षेची त्यांनी मागणी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा गावातून त्यांच्या कुटुंबीयांना भेटून गेला आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. त्याच्याकडून आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की,कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून संपूर्ण बीड जिल्ह्यात त्याची दिंड काढावी, असे धनंजय देशमुख म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आता 26 तारखेला सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलांकडून वारंवार उशीर केला जात असल्याचा आरोप देखील आता देशमुख कुटूंबियांकडून केला जात आहे. त्याचबरोबर आजच्या सुनावणीत आरोपीचे वकील,पुराव्याची कमतरता आणि सरकारी वकीलच्या नियुक्तीवरून जोरदार वाद झाला.

बीड सत्र न्यायालयाने आजच्या सुनावणी सरकारी पक्षाला कडक सूचना दिल्या आहेत.सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आरोपी पक्षाला करण्यात यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. पुराव्यांच्या कमतरतेमुळे आणि तांत्रिक बाबीमुळे खटल्याला विलंब होत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितल आहे.