ब्रेकिंग!अजित पवारांच्या अपघातप्रकरणी नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या ; रोहित पवारांनी केली मागणी..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आज दिल्लीत आमदार रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्याची मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता या अपघात प्रकरणावरून संशय अधिकच वाढत चालला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागवले होते, परंतु केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.दरम्यान त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी थेट नागरी हवाई वाहतूक मंत्री यांच्याकडे बोट ठेवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पुढे बोलताना, व्हीएसआर कंपनी, नागरी उड्डाण वाहतूक महासंचालनालय यांच्याविषयीची शंका त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. विमानातील इंधनटाक्यावरून त्यांनी पुन्हा एकदा हा एक व्यापक कट असल्याची शंका उपस्थित केली. त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे..

दरम्यान व्हीएसआर कंपनीचे मालक आणि तेलुगु देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का अशी शंका यापूर्वी रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंत्री के. राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मागणी करत आहोत. राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा ही विनंती करतो. टीडीपीचे मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा. ही आमची मागणी आहे, असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.