ब्रेकिंग! मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये एसीबीचे पथक दाखल ; 35 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी चौकशीचा ससेमीरा..


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका लिपिकाला तब्बल 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी वातावरण चांगलेच तापले असून मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथक दाखल झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक दाखल झाले असून, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाची ते सखोल चौकशी करत आहे. तक्रारदार हरिराम घांची यांच्यासह पाच ते सहा अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. या पथकासोबत प्रिंटर व इतर आवश्यक उपकरणे देखील आहेत, जे जबाब नोंदवण्यासाठी आणि पुरावे जमा करण्यासाठी वापरले जातील. यातून काय महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए (खाजगी सचिव) रामदास काळे यांच्यावरही लाचखोरीचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्रालयात अनेक वर्षांनंतर झालेली ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. एसीबीचे अधिकारी प्रकरणाशी संबंधित तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ठोस पुरावे गोळा करत आहेत.

मंत्रालयातील या कारवाईमुळे या प्रकरणात गुंतलेल्या अन्य व्यक्तींचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयात भ्रष्टाचारविरोधी मोहीम तीव्र झाली असल्याचे यातून दिसून येत आहे. या कारवाईतून आता आणखीन कोण रडारवर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!