विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार; सीबीएससी बोर्डाचा मोठा निर्णय..


पुणे : राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा सुरू झाली असून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाचा भर राहिला आहे.आता दहावीच्या परीक्षेबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. सीबीएससी ने आता दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

सीबीएसी बोर्डाने दहावीच्या परीक्षेबाबत असे स्पष्ट केले आहे की, पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल. नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांना गैरहजर राहतील ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र नसतील असं बोर्डाने स्पष्ट केल आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची पहिली परीक्षा देणे अनिवार्य असणार आहे.

दरम्यान आज 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत दहावीची परीक्षा सुरू असेल. आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे. राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!