प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीना ‘ त्या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स ; 26 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना चाळीस हजार कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी आणि मनी लॉन्ड्री प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या प्रकरणात चौकशीसाठी त्यांना 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, 40हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते निर्धारित दिवशी हजर राहिले नसल्याने ईडीने नव्याने समन्स जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर 26 फेब्रुवारीची चौकशी महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या वापराबाबत आणि निधीच्या कथित वळवणुकीबाबत तपास सुरू आहे. या आर्थिक व्यवहारांतून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्या अनुषंगाने ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू केली आहे. आता दिल्लीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश अंबानींना दिले आहेत.या प्रकरणामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आता येत्या 26 फेब्रुवारी रोजी अनिल अंबानी ईडीसमोर हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासानुसार अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.