शिरूर येथे चिमुकलीसोबत अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य, ताप आल्याने डॉक्टरकडे नेलं अन् उघड झालं कांड…


पुणे : येथील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ८ वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना केवळ एका तापामुळे उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून नराधम अल्पवयीन आरोपीने तिथे प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला कल्पना नव्हती. त्याने चिमुकलीला कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली आणि तो तिथून पळून गेला.

घाबरलेल्या मुलीने कोणालाही काही सांगितलं नाही, मात्र अखेर ते उघड झालं. तीव्र ताप आला आणि तिची प्रकृती बिघडली. मुलीला ताप आल्याने पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले.

दरम्यान, डॉक्टर जेव्हा तिची तपासणी करत होते, तेव्हा त्यांना काहीतरी धक्कादायक आढळले. सखोल तपासणीत या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी तत्काळ ही बाब पालकांच्या कानावर घातली. यामुळे सगळेच हादरले.

तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला. पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत अनेकांना धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!