लाडक्या बहिणी अधिक लाडक्या! सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

ई-केवायसी पडताळणीनंतर या लाडक्या बहिणींची संख्या देखील कमी झाली आहे. दरम्यान, सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
कारण, लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.

दरम्यान, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने लाडक्या बहिणींसाठी हा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे. लाडकी बहिण योजनेचा गेल्या वर्षी राज्यात 2.4 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला होता.
त्यानंतर ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ डिसेंबर २०२५ पासून थांबवण्यात आला होता. आता हा ई-केवायसी पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात हा हफ्ता मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.