मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला ‘त्या’ पाच आमदारांचा विरोध; रोहित पवारांनी बॉम्ब फोडला..


पुणे:महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड कधी होणार याची ही उत्सुकता सर्वांनाच आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करावी यासाठी 35 आमदारांनी आणि 32 प्रमुख पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला.पण 5 आमदारांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही असा दावा आमदार रोहित पवारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाला त्यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की,सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करणारे 35 आमदार दादांच्या विचारांचे आहेत. तर या पाठिंब्याच्या पत्रावर पाच ते सहा आमदारांनी स्वाक्षरी केलेली नाही.. सुनेत्रा पवार यांना त्या पाच आमदारांचा विरोध आहे का? त्यांना सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ वाटत नाही का? असा बॉम्बगोळा टाकत त्या नेत्यावर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. स्वाक्षरी न केलेल्या पाच ते सहा जणांच्या मनात कदाचित काही वेगळं असावं. त्यातील एकाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल असा टोलाही त्यांनी लगावला.त्यामुळे त्यांचा रोख कुणाकडे आहे हे समोर आलं आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी यापूर्वी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडावे यासाठी पाठिंबा देणाऱ्या 35 आमदारांचे अभिनंदन केले. ज्या 35 आमदारांनी सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष प्रस्तावित केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जवळपास 32, 33 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कागदावर लिहून दिले आहे की सुनेत्रा काकीच अध्यक्ष असाव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!