लाडक्या बहिणींच टेन्शन वाढलं! तब्बल 86 लाख अर्ज बाद, 1500 रुपये कायमचे बंद..


पुणे : मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतून तब्बल 86 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.त्यामुळे या महिलांना आता 1500 रुपयेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेक महिलांना मोठा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेसाठी महाराष्ट्रातील एकूण 2.4 कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता. या योजनेत आता फक्त 1.6 कोटी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. जानेवारीच्या 14 तारखेला हा हप्ता देण्यात आला होता.ही योजना सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत 86 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

दरम्यान योजनेच्या हप्त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून निधी वितरित करण्यात आला आहे. जवळपास 98 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.

या योजनेची ई केवायसी करताना या लाडक्या बहिणींची माहिती भरताना चूक झाली आहे त्या महिलांना पुन्हा एकदा चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडा दिलासा मिळाला आहे.आता लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!