‘पोद्दार’ इंटरनॅशनल ग्रुपवर कुणाची मेहरबानी? वादग्रस्त प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अल्पसंख्याक खात्यातला ‘आका’ कोण?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा असतानाही काही तासांतच राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आले होते.यामध्ये ‘पोद्दार’ इंटरनॅशनल ग्रुपच्या 25 शाळांचा देखील समावेश होता. या पोद्दार ग्रुपवर एवढी मेहेरबानी का? वादग्रस्त प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अल्पसंख्यांक खात्यातील आका कोण? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग खाते होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ते सोपवण्यात आले. 75 शाळाबाबत प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल त्यांनी घेतली. या संपूर्ण प्रकारणाची चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्रालयात कामकाज ठप्प असतानाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनाची माहिती देत शासकीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही अजित पवारांच्या अखत्यारीत येणाऱ्या अल्पसंख्याक विभागाने दुखवटा सोडून वादग्रस्त कारभार सुरू ठेवला. यावरून आता या विभागातील आका कोण?याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान या प्रकरणासंबंधी संशयाची सुई असणारे सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण वादात अडकले असल्याने याची सखोल चौकशी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!