भिगवण अपहरण प्रकरणी नवीन माहिती समोर ; पोलिसांची सहा पथक आरोपींच्या मार्गावर ; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक …


पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील एका 21 वर्षीय तरुणीचे भर रस्त्यात अपहरण झाल्याची धकादायक घटना काल उघडकीस आली होती. या अपहरण घटनेत आता मोठा ट्विस्ट आला असून तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या महिनाभरापासून संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,संबंधित तरुणीचे 22 फेब्रुवारीला लग्न होते. लग्नाची खरेदी करून घरी परत असताना तिच्या अपहरणाची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणी आणि संशयित आरोपींची घरे शेजारी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. तसेच त्या दोघांच्यात मागील महिनाभर फोनवर संवाद सुरू असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानची कॉल डिटेल्स तपासले असता नियमित सिम कार्ड वरून बोलणे झाल्याचे समोर आले आहे.तसेच या तरुणीच्या फोनचा व्हाट्सअप डेटा मागविण्यात आला असून त्यातून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलिसांकडून विविध तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके रवाना केली असून सुमारे 165 किलोमीटर पर्यंतचा संभाव्य मार्ग नकाशावर निश्चित करून शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात अपहरण आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आरोपींचे फोन बंद असल्याने मोबाईल लोकेशन तपासणी सध्या सुरू आहे.या प्रकरणातील आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!