ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्यासह पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; केली मोठी मागणी?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री तथा अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्यासह सुपुत्र पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असताना खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, पार्थ पवार आणि स्वतः मी आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाती मृत्यू कसा झाला त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिल आहे. त्यांच्या विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.

तसेच तपासातून जे सत्य समोर येईल ते राज्य आणि देशातील जनतेसमोर ठेवावं असंही त्यांनी म्हटलं आहे. कारण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करतात त्यावेळी बाहेरील अपघाती प्रकऱणाचा तपास करणाऱ्यांचीही मदत तिथे होऊ शकत असते असे देखील तटकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, त्यामुळे आमची मागणी आहे की, सखोल तपास व्हावा. जे मुद्दे उपस्थित होतील त्यासह हा तपास केला जावा आणि तो निष्कर्ष राज्यासह देशातील जनतेसमोर ठेवावा. यामुळेच आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली,अशी मागणीही सुनील तटकरेंनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!