राज्य सरकारने माझी अन् अजितदादांची केस थांबवायला सांगितली पण दिल्लीतून सूचना आल्या अन्…, रोहित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : माझी जी ईडीची केस आहे, त्या बाबत सेशन कोर्टमध्ये हजेरी होती. माझी जी केस आहे, त्यात अजितदादांची केस पण आहे. इतरं नेत्याचीही केस आहे. या केसमध्ये बँकेचा विषय आहे, कुठेच काही चुकीचं झालेलं नाही. ईओडब्ल्यूने ईडीला सांगितलं आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे.

पण ईडीला हा विषय सोडायचा नाहीय. २६ जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला. दिल्लीतून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना आल्या आहेत. या १३ तारखेला कोर्टात ईडीने राज्य सरकार विरोधात विषय मांडला.
आम्हाला या विषयात अजून खोलात जाऊन तपासा करायचा आहे. आम्हाला संघर्ष करायचा आहे, मात्र सत्तेत असलेल्यांना वाटेल आम्ही सुटलो असे नाही, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हाला आहे, असं रोहित पवार म्हणाले.

कोड कधी,कधी सुटत नाही. जे लोक आता सत्तेत आहेत, ईडीकडे त्यांचा विषय आहे. पण त्यांचा विषयही आता ईडी का सोडत नाही? हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. हा विषय जेव्हा दिल्लीत गेला होता, तेव्हा दिल्लीकडून सांगण्यात आलं, जे जे नेते आहेत, त्यांना सोडू नका. कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात विरोधाभास वाटतो, असं रोहित पवार म्हणाले आहे.
विरोधात असल्यामुळे आम्हाला संघर्षच करायचा आहे. पण ज्यांना असं वाटते सत्तेत आहोत म्हणून आम्ही सुटलो. त्यांची उद्या मोठी अडचण होऊ शकते, असं रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतही रोहित पवार बोलले. टीव्हीवरुन मला ही बातमी कळली. ज्या ३५ आमदारांनी सुनेत्राकाकींच नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुरस्कृत केलं, त्यांचे आभार मानतो.
त्याशिवाय त्या पक्षाचे ३२ ते ३५ पदाधिकारी, त्यांनी सुद्धा कागदावर सुनेत्राकाकींच नाव स्पष्टपणे लिहिलं. आमदार, पदाधिकारी सर्व सुनेत्राकाकींसोबत आहेत, मी त्या सर्वांच अभिनंदन करतो, आभार मानतो. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, असं रोहित पवार म्हणाले.