मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ‘त्या’ प्रकरणावर तीव्र नाराजी, कडक शब्दात समज..

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच त्यांनी पक्षाशी मोठ्या प्रमाणात बदनामी होत असल्याने कडक शब्दात समजही दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तो लिपिक झिरवाळ यांच्या कार्यालयात कामाला होता.त्यामुळे त्यांचेही नाव जोडले गेले.या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ काही काळ नॉट रिचेबल होते. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असताना आता या प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात नरहरी झिरवळ यांना कडक शब्दात काही सल्ले दिले आहेत

पवार यांनी असं म्हटलं आहे की,स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही याची सर्वस्वी काळजी घ्या. प्रशासन आणि अधिकारी तुमच्या कारभारामुळे बदनाम होणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशा कडक शब्दात सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना समज दिली.या घटनेमुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.