कर्जमाफीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय! थकीत कर्जदारांबाबत दिले महत्वाचे आदेश, अर्थसंकल्पात निर्णय होणार?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मागणी केली जात आहे. याबाबत आता राज्य सरकार कर्जमाफीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

आता राज्यातील सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे शेतकरी देखील याकडे डोळे लावून आहेत.

दरम्यान, याबाबत नाशिक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. जून 2025 पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती नाशिक जिल्हा बँकेकडून देखील घेतली जात आहे. 74 हजार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. याबाबत सगळीकडे सूचना दिल्या आहेत.

सेवा सरकारी सोसायटी, सचिव, बँकेचे तपास अधिकारी, बँकेचे शाखाअधिकारी यांच्यामार्फत आम्ही थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहोत. असेही सांगितले जात आहे. यासाठी राज्य शासनाच्या मदतीसाठी एक समिती गठीत केली आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झाले होते.

सध्या लवकरच अधिवेशन सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सरकार अभ्यास करत असल्याचे बोलले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!